16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे विवस्त्र फोटो कॉलेजमध्ये व्हायरल केले
Mumbai Crime : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या व्हायरल केल्या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तिघांना अटक.
मुंबई: मुंबईच्या मालाड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या व्हायरल केल्या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पीडित मुलगी ही गोरेगावच्या एका नामंकित शाळेत शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीला एका आरोपीने 1 डिसेंबर रोजी धमकावून तिच्याकडून तिचा विवस्र फोटो मागून घेतला. तो फोटो आरोपीने त्याच्या परिसरात रहात असलेल्या 19 वर्षीय दुसऱ्या आरोपीला पाठवला. त्याने तो फोटो पुढे 18 वर्षीय मित्राला पाठवला. या आरोपीने तो फोटो कॉलेजाच्या ग्रुपमधील मुलांना दाखवून पिडीत मुलीची बदनामी करत फोटो सार्वजनिक केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बांगूरनगर पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: A 16-year-old girl’s nude photos went viral in a college
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News