संगमनेर: मोमिनपुरा व नायकवाडपुरा येथे दोन करोना पॉझिटिव्ह
Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरात आज दोन रुग्णांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. संगमनेरमधील मोमिनपुरा व नायकवाडपुरा या भागात रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर शहरातील मोमिनपुरा येथील ४६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. तसेच नायकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या दोन जणांची भर पडल्याने एकूण करोनाबाधित संख्या ९९ वर पोहोचली आहे.
प्रशासनकडून या दोन व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. दररोज करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Website Title: Coronavirus Sangamner News update