Coronavirus: राज्यात १५,७६५ करोनाबाधितांची वाढ एकूण ८ लाख पार
Coronavirus | मुंबई: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे. मंगळवारी राज्यात १५,७६५ करोनाबाधितांची वाढ झालेली आहे. राज्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ८ लाख ८ हजार ३०२ इतकी झाली आहे. तसेच राज्यात सध्या २ लाखांच्या आसपास व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.
राज्यात दिवसभरात १० हजार ९७८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३२ टक्के इतका आहे.
मंगळवारी राज्यात १५,७६५ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज ३२० मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सध्या १ लाख ९८ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ७२.३२ टक्के इतका आहे. राज्यात एकूण ४२ लाख ११ हजार ७५२ करोना चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ८ लाख ८ हजार ३०६ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
Web Title: Coronavirus Patients Numbers Increased Maharashtra