अकोले शहरात ०४ सह तालुक्यात आज एकूण ०६ कोरोना बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज एकूण सहा करोनाबाधित आढळून आले आहेत त्यामध्ये शहरात ४ तर ग्रामीण भागात २ आढळून आले आहेत. कारखाना रोडला पुन्हा कोरोनाच्या विळाख्यात आला आहे.
तालुक्यात आज घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये महालक्ष्मी कॉलनीत ३७ वर्षीय पुरूष, कारखाना रोडवरील ६० वर्षीय पुरूष, ५७ वर्षीय महीला, विठा येथील ४० वर्षीय पुरुष अश्या चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात कोतुळ येथील ३२ वर्षीय महीला तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील सावरकर रोडवरील २६ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला .
आज तालुक्यात ०६ व्यक्ती पॅाझिटीव्ह आले असुन तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ५५७ झाली आहे त्यापैकी ४४० व्यक्ती उपचार करुन बरे होउन घरी गेलेत ११ व्यक्ती मयत झालीत १०६ व्यक्तीवर उपचार सुरु आहेत.
अलताफ ईस्माईल शेख संपर्क (७३८७०२०५९७) पञकार, अकोले
Web Title: Akole Taluka six corona infected today