तळपायाला चीप, हिडन कॅमेऱ्यातून प्रश्नपत्रिका स्कॅन, तलाठी परीक्षेतील धक्कादायक प्रकार
Talathi Bharti online exam: तलाठी भरती ऑनलाईन परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी पुरवठा.
नाशिक: तलाठी भरती ऑनलाईन परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी पुरवठा करत मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील दृश्याची पुनरावृत्तीची घटना दिंडोरी रोडवर वेब इन्फोटेक सोल्युशन केंद्रावर उघडकीस आली. पोलिसांनी हायटेक कॉपी पुरविणाऱ्या संशयिताला बेड्या ठोकल्या.
दिंडोरी रोडवरील परीक्षा केंद्राबाहेर हातात मोबाईल वॉकीटॉकी लॅपटॉप व हेडफोनजवळ बाळगून संशयास्पद हालचाली करणाऱ्या गणेश श्यामसिंग गुसिंगे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परसोडा गावातील २५ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले संशयित गणेश गुसिंगे याची चुलत बहीण संगीता रामसिंग गुसिंगे तलाठी परीक्षेसाठी नाशिकच्या केंद्रावर आली होती. त्यावेळी परीक्षा केंद्रात जाताना तिने तळपायाला इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री चिटकवून पायात चप्पल घालून केंद्रात प्रवेश मिळविला. परीक्षा सुरू झाल्यानंतर दोघांमध्ये प्रश्न- उत्तराचा तास रंगला. परीक्षा केंद्रावर बसविण्यात आलेले फोर जी जॅमर फायजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्रॅक करत परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या भावाने परीक्षेतील उत्तरे सांगण्याचे सुरुवात केली. विद्यार्थिनीने कानात मायक्रो हेडफोन व कपड्यावर न दिसणारा छुपा कॅमेरादेखील लपविलेला होता. प्रश्नपत्रिका कपड्यासमोर धरल्यानंतर त्यातील प्रश्न स्कॅन होऊन ते काही सेकंदाच्या अंतराने गुसिंगेच्या मोबाईलवर जात होते आणि तो ते प्रश्न गुगलवर सर्च करून त्यातील उत्तरे शोधून वॉकीटॉकीद्वारे बहिणीला सांगत होता. बहीण-भावाचा हा प्रश्नोत्तराचा तास पोलिसांच्या लक्षात आला.
Web Title: Copy supply in hi-tech method in Talathi Bharti online exam
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App