संसर्गामुळे चिंता वाढली: अहमदनगरमध्ये महिनाभरात आठ हजार मुलांना कोरोनाची बाधा
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात महिनाभरात वाढत्या संसर्गामुळे ८ हजार मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात महिनाभरात ७७ हजार ९२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ८८८१ मुले हे १८ वर्षाच्या वयोगट आतील आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढते आहे. मे महिन्यातील लहान वयोगटातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८८८१ इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची तयारी केली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित मुलांसाठी स्पेशल वार्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
अशा प्रमाणातील रुग्ण संखेने तिसरी लाट सुरु तर झाली नाही ना असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. राज्य तथा जिल्हा प्रशासनाकडून टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
Web Title: children contracted corona in a month in Ahmednagar