नव्या गाडीच्या पूजेची तयारी; आईपुढे आला मुलाचा मृतदेह
दुचाकीला अपघात (Accident) होऊन मुलाचा जागीच मृत्यू झाला. पूजेचे ताट घेऊन वाट पाहणाऱ्या आईवर मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ.
नांदेड : ‘आई मी नवीन मोटारसायकल घेतली आहे. गाडीची पूजा करायची आहे, तू तयारी करून ठेव, मी तासाभरात येतो,’ असे मुलाने आईला फोन करून सांगितले. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. मुलगा पुण्याहून घरी येणार असल्याने आईही आनंदी झाली. परंतु दुर्दैवाने गाव ४० किमी अंतरावर असतानाच दुचाकीला अपघात होऊन मुलाचा जागीच मृत्यू झाला. पूजेचे ताट घेऊन वाट पाहणाऱ्या आईवर मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आली. ही घटना १४ एप्रिल रोजी दुपारी कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथे घडली.
अविनाश बापूराव जाधव (वय २२) हा तरुण पुणे येथे खासगी कंपनीत काम करत होता. १५ दिवसानंतर त्याच्या भावाचे लग्न असल्याने तो गावाकडे निघाला होता.
नांदेडला आल्यावर आईला फोन करून मी नांदेडला आलो आहे. मी नवीन गाडी घेतली, त्या गाडीच्या पूजेची तयारी करून ठेव, असे सांगितले. आईने मोठ्या आनंदाने पूजेचे ताट तयार करून ठेवले. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. पेवा गाव ४० किमी दूर असताना वारंगा येथे दुचाकीला भीषण अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला. यावेळी त्याच्यासोबत असलेला देवानंद जाधव हा किरकोळ जखमी झाला.
Web Title: child died on the spot due to a two-wheeler accident
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App