थरारक! बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू
Mumbai-Pune Highway Accident: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोर घाट येथे एक खासगी बस दरीत कोसळून अपघात (Accident) झाल्याची घटना, या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, मृतांची आकडा वाढण्याची शक्यता.
खोपोली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोर घाट येथे एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बसमध्ये एकून 40 ते 45 लोक प्रवास करत होते.
हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला असून अपघातानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अधिक माहितीनुसार, ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 16 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
रोपच्या साहाय्याने जखमी आणि मृतांना वर काढण्यात येत असून या बचावकार्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुचना दिल्या आहेत. मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमी झालेल्या सर्वांचा खर्च सरकार करणार आहे.
Web Title: 13 people died after the bus fell into the valley
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App