Home अकोले अकोलेत उसाच्या शेतात गांजाची झाडे, साडेसात लाखाचा गांजा हस्तगत

अकोलेत उसाच्या शेतात गांजाची झाडे, साडेसात लाखाचा गांजा हस्तगत

cannabis seized in akole Crime filed

अकोले | Crime: अकोले तालुक्यातील मेहंदूरी गावाच्या शिवारात उसाच्या शेतात बेकायदा गांजाची झाडे अकोले पोलिसांनी छापा टाकत हस्तगत केली आहे. तब्बल साडेसात लाख रुपये किमतीची झाडे हस्तगत करण्याची कारवाई बुधवारी सायंकाळी केली आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकास पोलीस पथकाने अटक केली आहे.

मेहंदूरी शिवारात प्रवरा नदीलगत उसाच्या शेतात १२ ते १५ गांजाची झाडे आढळून आली आहे. रोडाजी उर्फ रोहिदास रामभाऊ पथवे यांच्या शेतात ही झाडे मिळून आली. या हिरव्या गांजा पाल्याचे वजन साधारणतः ७५ किलो आहे. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून रोडाजी उर्फ रोहिदास रामभाऊ पथवे यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार हे करत आहे.

Web Title: cannabis seized in akole Crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here