Home अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू

Ahmednagar Corona patient 32 death 

अहमदनगर | Ahmednagar Corona: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २६३७ रुग्णांची वाढ झाली आहे त्यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या १८ हजार ६०५ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या २५७५ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,४२,३१७ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आज ४१०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण ९१.३७ टक्के इतके आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा ६७१, संगमनेर २०९, राहुरी २६०, राहता २६२, पाथर्डी १६४, पारनेर ३३२, नेवासा २०१, नगर ग्रामीण ३५७, कोपरगाव ३१९, कर्जत २०४, जामखेड १०७, अकोले १४४, श्रीरामपूर ६१, श्रीगोंदा ४३५, शेवगाव १९८, कॅन्टोन्मेंट ४७, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा १३२, इतर राज्य ३ असे जणांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar Corona patient 32 death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here