Home महाराष्ट्र दोघांत तिसरा आला अन् तिघांच्याही आयुष्याचा दुर्दैवी शेवट, प्रेयसीच्या पतीची हत्या करताना...

दोघांत तिसरा आला अन् तिघांच्याही आयुष्याचा दुर्दैवी शेवट, प्रेयसीच्या पतीची हत्या करताना प्रियकराचा मृत्यू

Breaking News | Solapur Crime: विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून (Murder) करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तिने आपला प्रियकरही (Lover) गमावल्याचे समोर आले.

Boyfriend dies while killing girlfriend's husband

सोलापूर: सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात तिने आपला प्रियकरही गमावल्याचे समोर आले आहे.  पांगरी पोलिसांनी या प्रकरणात मयत गणेश अनिल सपाटे (वय 26, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय 35) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, रूपालीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी  सोलापुरातील ढाळे पिंपळगाव तलावात दोन मृतदेह सापडले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धक्कादायक सत्य समोर आले आहे. विवाहित महिलेने आपल्या पतीचा काटा काढण्यााठी प्रियकरासोबत योजना आखली.  ठरलेल्या प्लॅनिंगनुसार महिलेने पतीला तलावाजवळ बोलावले. त्यानंतर प्रियकराने पतीला उचलून थेट पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने जीव वाचवण्यासाठी धडपड करत महिलेच्या प्रियकराला मिठी मारली होती. त्यामुळे तोही पाण्यात पडला. जीव वचावण्याच्या धडपडीत दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेत तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रूपाली पटाडे (वय 35) आणि शंकर पटाडे (वय 40) या दाम्पत्याने प्रेमविवाह केला होता. शंकर गाडीचालक तर रूपाली घरकाम करत होती. काही वर्षे सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, त्यांचं नातं तेव्हाच ढासळायला लागलं जेव्हा बार्शीमधील गणेश सपाटे (वय 26) रूपालीच्या आयुष्यात आला. रूपाली आणि गणेश यांच्यात अनैतिक संबंध सुरू झाले. शंकरला याचा संशय आला आणि त्याने रूपालीला हे संबंध तोडण्याचा सल्ला दिला. पण गणेशच्या प्रेमात गुंतलेल्या रूपालीने पतीची एकही गोष्ट ऐकली नाही. उलट, पतीचाच काटा काढायचा ठरवला.

18 फेब्रुवारी 2025 रोजी, रूपाली आणि गणेशने पती शंकरला हटवण्याचा प्लॅन आखला. त्या दिवशी गणेशने शंकरला मित्रांसह एका हॉटेलमध्ये नेले. तिथे मद्यप्राशन केल्यानंतर त्याला धाराशिव जवळ असलेल्या कलाकेंद्रात घेऊन जाण्याचे कारण सांगत गाडीतून बाहेर पडले. गणेशने पूर्वनियोजित पद्धतीने ढाळे पिंपळगाव तलावाजवळील पुलावर गाडी थांबवली. ‘पुलावर डान्स करूया आणि फोटो काढूया’ असं सांगून त्याने शंकरला पुलावर आणलं.

पुलावर रात्री डान्स करत असतानाच गणेशने शंकरला खांद्यावर घेत पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शंकरने गणेशला घट्ट मिठी मारल्यामुळे तोसुद्धा त्याच्यासोबत पाण्यात पडला. दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते आणि त्यामुळेच दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांना मृत्यू संशयास्पद वाटल्याने तपास सुरू झाला. रूपालीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर सत्य बाहेर आले. तिच्या कबुलीजबाबानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पांगरी पोलिसांनी गणेश सपाटे आणि रूपाली पटाडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, रूपालीला अटक करण्यात आली आहे. प्रियकर, पती आणि आता स्वतः रूपाली – तिघांच्याही आयुष्याचा दुर्दैवी शेवट या नात्यांतील फसवणुकीच्या गुंत्यात झाला.

Web Title: Boyfriend dies while killing girlfriend’s husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here