अहमदनगर: विवाहितेच्या तोंडात ओतली फिनेलची बाटली
Breaking News | Ahmednagar: लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून दुसरा लग्न करण्यासाठी सोडचिठ्ठी दे. तुझ्या लहान बहिणीशी मला लग्न करायचे आहे असे सांगत विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ करताना घरातील फिनेल बाटली विवाहीतेच्या तोंडात ओतल्याची घटना.
राहुरी : लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून दुसरा लग्न करण्यासाठी सोडचिठ्ठी दे. तुझ्या लहान बहिणीशी मला लग्न करायचे आहे असे सांगत विवाहीतेचा शारिरीक व मानसिक छळ करताना घरातील फिनेल बाटली विवाहीतेच्या तोंडात ओतल्या प्रकरणी सासरच्या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
रेश्मा सुनिल साळवे चिंचविहीरे यांनी तक्रार दाखल केली आहे. साळवे यांचे पती सुनिल कारभारी साळवे हे बाहेर नोकरीला आहेत. २४ जून २०१८ रोजी विवाह झाल्यानंतर सासरच्या लोकांनी रेश्मा साळवे यांना चांगल्या पद्धतीने नांदविले. त्यानंतर सुनिल सुट्टीला घरी आल्यानंतर विवाहीता रेश्मा यांच्याशी काही ना कारणास्तव वाद घालत मारहाण करू लागला. सासू मंदा यांच्याकडूनही मारहाण होत. ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी दारू पिऊन आलेल्या सुनिल
याने विनाकारण मारहाण केली. तुला मुलगा होत नाही. तुझ्या आईने लग्नात हुंडा दिला नाही. तुझ्या आईकडून दोन लाखाचा हुंडा आण. तुझ्यामुळे मला दूसरे लग्न करता येत नाही. मला सोडचिठ्ठी देत असे सांगितल्यानंतर विवाहीता रेश्मा यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे शारिरीक व मानसिक छळ करीत तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्र लावून दे असे वारंवार सांगत घरातील फिनेलची बाटली तोंडात ओतली. अशा फिर्यादीनुसार रेश्मा साळवे यांनी पती व सासू विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Web Title: bottle of Fennel poured into the bride’s mouth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study