अहमदनगर ब्रेकिंग : अवकाशातून पडली एक वस्तू , छत फोडून थेट घरात, जिल्ह्यात खळबळ
Ahmednagar News | object fell from space, through the roof and directly into the house: उल्कापात सदृश घटना घडली. अवकाशातून सदर वस्तू अगदी वेगात खाली आली आणि घराचे छत फोडून घरात कोसळली. खाली जमिनीला देखील मोठे खड्डे पडले आहे. सदर घटनेने सर्वत्र खळबळ.
अहमदनगर | कोपरगाव: अवकाशामध्ये आपल्याला अनेक अशा रहस्यमयी घडामोडी दिसतात. शाश्रज्ञही त्यावर संशोधन करत असतात. उल्का, उल्कापात हाही यातलाच एक प्रकार. मध्यंतरी तर परग्रहावरचे लोकांची तबकडी दिसल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात एक घटना घडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारात आज सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी उल्कापात सदृश घटना घडली. अवकाशातून सदर वस्तू अगदी वेगात खाली आली आणि घराचे छत फोडून घरात कोसळली. खाली जमिनीला देखील मोठे खड्डे पडले आहे. सदर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सदरची ठिकाणी घरातीलच एक व्यक्ती पलंगावर मोबाईल पाहत होता. त्यांना पत्र्याचा आवाज होत त्यांना ज्वलनशील वस्तू घरात पडताना दिसली. ते सुदैवाने वाचले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सदर उल्का सदृश्य वस्तू आपल्या ताब्यात घेतली आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
उल्कासदृश दगड हा साधारण तीन किलो वजनाचा असून जमिनीवर तो पडल्याने जमिनीला खड्डा पडून त्या उल्क सदृश्य वस्तूचे तुकडे झाले होते. दरम्यान सदर घटना समजताच नागरिकांनी तेथे धाव घेतली आहे.
Web Title: object fell from space, through the roof and directly into the house
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App