Home अहिल्यानगर अहमदनगर: पोलीस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर: पोलीस ठाण्यातच विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न

Breaking News | Ahmednagar: तुम्ही आरोपीला अटक करत नाही ना, मग मी आता मरतो व तुम्हाला गुंतवतो, अशी धमकी देत त्याने बरोबर आणलेले  विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना.

Attempted suicide by consuming poison in the police station itself

अहमदनगर : पत्नी व मुलींना मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिस अटक करत नसल्याच्या निषेधार्थ एकाने नगर तालुका पोलिस ठाण्यात गोंधळ घालत.

तुम्ही आरोपीला अटक करत नाही ना, मग मी आता मरतो व तुम्हाला गुंतवतो, अशी धमकी देत त्याने बरोबर आणलेले  विषारी औषध पिवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (दि. १५) दुपारी घडली. रमेश नवल्या काळे (रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाराचे नाव आहे.

रमेश काळे याचे गावातील काही जणांशी गायरान जमिनीच्या कसण्यावरून वाद आहेत. त्यातील श्रीमंत्या जीवलाल चव्हाण, आदेश केरू काळे, विनोद श्रीमंत्या चव्हाण (सर्व रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) यांनी दि. ३ जुलै रोजी रमेश काळे याची पत्नी व मुलींना मारहाण केली होती. श्रीमंत्या चव्हाण याने तर तलवारीने वार केले होते. त्या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केल्यानंतर याबाबत रमेशची पत्नी सावित्रा हिच्या फिर्यादी वरून तिघांच्या विरुद्ध शिवीगाळ, मारहाणीसह आर्म ऍक्टचा नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ. शिवाजी माने हे करत आहेत. सोमवारी (दि.१५) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पो.हे.कॉ. माने हे पोलिस ठाण्यात काम करत असताना रमेश काळे तेथे आला. त्याने सदर आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही? असे म्हणत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. माने हे त्यास समजून सांगत असताना त्याने आरडाओरडा करत गोंधळ घातला. तसेच तुम्ही आरोपीला अटक करत नाही ना, मग मी आता मरतो व तुम्हाला गुंतवतो, अशी धमकी देत त्याने बरोबर आणलेले काही तरी विषारी औषध बाहेर काढून ते प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथे असलेल्या पो. हे.कॉ. माने, पो.हे.कॉ. माने व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले व त्याच्या हातातून विषारी औषधाची बाटली हिसकावून घेतली.

या प्रकाराबाबत पो.हे.कॉ. शिवाजी माने यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी रमेश काळे याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२६, ३५१ (२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Attempted suicide by consuming poison in the police station itself

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here