Home अहिल्यानगर पतंगाच्या मांजाने दोन तरुण जखमी

पतंगाच्या मांजाने दोन तरुण जखमी

Ahmednagar Two young men were injured by a moth bite

Ahmednagar News Live | Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात के भोकर येथील एक  व बेलापूर रोड एक अशी दोन ठिकाणी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पंतग उडविण्याच्या आनंद लुटत असताना या पतंगाच्या माज्याने तालुयातील भोकर येथील आदित्य झिने हा युवक जखमी झाला. ही घटना श्रीरामपूर शहरात घडली. तसेच श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरही सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंतगाच्या मांजाने एका तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली.

मुळचा भोकर येथील आदित्य सतिष झिने (वय 24) हा तरूण आपल्या आई समवेत सध्या शहरातील रावबहाद्दुर बारोवके महाविद्यालयाचे शिक्षक वसाहतीत राहतात. काल शुक्रवार दि. 14 जानेवारीच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील कॉलेज परीसरातील रेल्वे अंडर ग्राऊंड पुलाजवळच्या वसाहतीपासून शहरात मोटारसायकलने येत असताना अचानक मानेला काहीतरी रूतत असल्याचे जाणवले. हा मांज्या लावलेली दोरा असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी हाताने दुर करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या हाताच्या बोटाला कापले. मांज्याने त्यांच्या बोटांना जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले. त्यांनी हाताने मांज्याचा दोर दूर केला नसता तर मांज्याच्या दोराने आदित्यच्या बोटावरची जखम गळ्यास होऊन मोठा अनर्थ होऊ शकला असता. केवळ दैव बलवत्तर म्हणून गळ्यावरचे बोटावर निभावले.

दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर- बेलापूर रस्त्यावर सुभाषवाडीकडे जाणार्‍या चौकत काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथील तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून स्थानिक नागरिकांनी त्यास रुग्णालयात  उपचारसाठी दाखल केले. पोलिसांनी मांजा विक्रेते व वापर करणारांवर कारवाई केली तर अशा घटना टळू शकतात. विक्रेते व मांजाचा वापर करणारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मांजावर बंदी असताना देखील अशा घटना घडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: Ahmednagar Two young men were injured by a moth bite

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here