Home अहमदनगर पोलिसांच्या गाडीला टेम्पोने धडक देत वाळू तस्काराचे पलायन

पोलिसांच्या गाडीला टेम्पोने धडक देत वाळू तस्काराचे पलायन

Ahmednagar sand smuggler escapes after hitting a police vehicle with a tempo

Ahmednagar | श्रीरामपूर: तालुक्यातील कमालपूर परिसरात वाळू तस्करी (sand smuggler) करणार्‍या टेम्पो चालकाने पाठलाग करणार्‍या श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या गाडीला धडक देत पलायन केले. सुदैवाने या गाडीत असलेले पोलीस निरीक्षक मधुकरराव साळवे यांच्यासह त्यांचे सहकारी बालंबाल बचावले

अशोक सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी मतदान होते. त्या निमित्ताने ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अनुषंगाने तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळवे हे कमालपूर गावात पेट्रोलिंग करीत होते. त्याचवेळी त्यांना एक पिवळ्या रगाचा विना नंबर टेम्पो कमालपूर रस्त्यावरून जाताना दिसला.

त्यावेळी वाळू वाहतूक करणार्‍या या टेम्पो चालकास थांबण्यास सांगितले. मात्र तो थांबला नाही. त्यामुळे साळवे यांनी धाडस दाखवत पोलीस वाहनान या वाळू वाहतूक करणार्‍या टेम्पोचा एक किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. पण पोलीस आपल्याला गाठीत असल्याचे टेम्पो चालकाच्या लक्षात येताच त्याने पोलीसांच्या वाहनास धडक दिली. व काही अंतरावर गेल्यावर चालकाने टेम्पो तसाच सोडून देत पळ काढली.

दरम्यान, पोलीसांनी हा टेम्पो हस्तगत केला असून तो श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. पसार झालेल्या चालकाचा डीवायएसपी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक साळवे व त्यांचे सहकारी पसार टेम्पो चालकाचा कसून शोध घेत आहेत.

Web Title: Ahmednagar sand smuggler escapes after hitting a police vehicle with a tempo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here