संगमनेर: बिबट्याच्या हल्ल्यात तीस वर्षीय महिला गंभीर जखमी
Breaking News | Sangamner Bibatya Attack: सायंकाळी शेतातून घरी परतत असताना ३० वर्षीय महिलेला बिबट्याने अचानक झडप घालत गंभीर जखमी.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) सायंकाळी शेतातून घरी परतत असताना ३० वर्षीय महिलेला बिबट्याने अचानक झडप घालत गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्चना संदीप टेमगिरे (वय ३०, रा. हिवरगाव पावसा) जखमी महिलेचे नाव आहे. त्या शेतातील काम आटोपून घरी परतत असताना बिबट्याने मागून झडप घालत हल्ला केला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिला बिबट्याच्या तावडीतून सोडून तातडीने संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
गेल्या काही दिवसांत संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा संचार झपाट्याने वाढत असून, अनेक गावांमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन व वन खात्याने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Breaking News: Thirty-year-old woman seriously injured in leopard attack
















































