अहिल्यानगर: आमिष दाखवत महिलेवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: जमीन पुन्हा नावावर करून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

राहुरीः दोघा बाप-लेकाने पतीला दारू पाजून खोटे मृत्युपत्र तयार करून तीन एकर जमीन नावावर करून घेतली. ती जमीन पुन्हा नावावर करून देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. राहुरीतील एका गावातील ३० वर्षीय महिला तिचा पती व १३ वर्षीय मुलासह राहत होते. पतीच्या निधनानंतर राजेंद्र शेळके व त्याचा मुलगा अक्षय शेळके यांनी पीडित महिलेचे पती जिवंत असताना त्यांना दारू पाजून खोटे मृत्युपत्र तयार केले. कागदोपत्री फेरफार करून पतीच्या नावावर असलेली जमीन अक्षय शेळके याच्या नावावर करून घेतली. पीडित महिला व तिचा मुलगा घरात असताना राजेंद्र शेळके हा महिलेच्या घरी गेला. त्याने मुलाला मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार केला. दोन महिन्यांनी परत शेळके पीडितेच्या घरी गेला. जमीन नावावर करतो, तू माझ्यासोबत चल. असे म्हणून त्याने परत अत्याचार केला. महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी राजेंद्र शेळके यास अटक केली आहे.
Breaking News: Woman abused while being lured
















































