Home अहिल्यानगर Hony Trap Case: जखणगावच्या बंगल्यात महिलेने अनेक श्रीमंतांना जाळ्यात ओढून केले शिकार

Hony Trap Case: जखणगावच्या बंगल्यात महिलेने अनेक श्रीमंतांना जाळ्यात ओढून केले शिकार

Ahmednagar Hony Trap Case arrested ladies

अहमदनगर | Hony Trap Case: श्रीमंतांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत शरीरसंबध ठेवून त्याचे विडीयो चित्रीकरण करून खंडणी मागणाऱ्या जखणगाव येथील महिला व तिच्या साथीदाराचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर या गुन्ह्याची व्यापकता अधिक वाढणार असल्याची शक्यता आहे. सदर महिलेने अनेकांना हनी ट्रैपमध्ये अडकविल्याची जखणगाव परिसरात चर्चा आहे.

पोलिसांनी सदर महिलेला व तिचा साथीदार अमोल सुरेश मोरे यांना न्यायालायाने २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मागील गेल्या ५ ते ६ वर्षापासून ही महिला श्रीमंत लोकांना हनी ट्रैपमध्ये अडकवून पैसे काढल्याचा प्रकार केला आहे. सदर महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने अनेकांचे अश्लील व्हिडियो काढून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची चर्चा होत आहे. पोलिसांनी त्या दृष्टीकोनातून तपास सुरु केला आहे. ज्यांची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे त्यानी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नवऱ्यापासून वेगळी राहणारी ३० वर्षीय महिलेचा जखणगाव येथे अलिशान बंगला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीमंत व्यावसायिकांना आपल्या जाळ्यात ओढले. एप्रिल महिन्यात नगर तालुक्यातील एकाला बोलावून शरीर संबंध ठेवण्यास भाग पडले. त्याचा व्हिडियो चित्रीकरण करत त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली तसेच त्याला मारहाण करून त्याच्याजवळील ऐवज लुटला. महिलेचा त्रास असह्य झाल्याने त्या व्यावसायिकाने पोलिसांकडे सर्व परिस्थिती कथन केली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला व तिचा साथीदार अमोल मोरे यास अटक केली.

Web Title: Ahmednagar Hony Trap Case arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here