पतीने पत्नीची हत्या करून केला आत्महत्यचा बनाव, पतीवर गुन्हा दाखल
कोपरगाव | Murder: पत्नीची हत्या करून तिने आत्महत्या केला असल्याचा बनाव करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील पती विजय उर्फ बंडू अप्पासाहेब गवळी याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मढी खुर्द येथील बंडू गवळी व त्याची पत्नी सुवर्णा यांच्यात १३ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भांडण झाले होते. यावेळी बंडू याने पत्नीच्या डोक्यात टणक शस्त्राने मारून ठार केले. या मृत शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मृत शरीरावर नवीन कपडे घालून पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांना दिली. सुवर्णा हिने आत्महत्या केली असल्याच्या खबरीवरून कोपरगाव पोलीस स्टेशनला १४ मे रोजी अकस्मात मृत्यची निंद केली होती.
पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी या घटनेची कसून चौकशी केली. यामधून ही आत्महत्या नसून घातपात असल्याचे समोर आले आहे.
याबाबत हेड कॉन्स्टेबल अमर गवसणे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार आरोपीने मयत सुवर्णाच्या डोक्यात टणक शस्त्राने मारून ठार केले. मृत शरीरावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला व पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले. सुवर्णा हिने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाइकांना देऊन पुरावा नष्ट केला. याप्रकरणी विजय उर्फ बंडू गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Husband commits suicide by murder wife