तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडियो इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या आरोपीस अटक
अहमदनगर | Ahmednagar: अश्लील फोटो व व्हिडियो इन्स्टाग्रामवर व्हायरल करत तरुणीला व तिच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाल्याने रोहित जालिंदर पाटोळे रा. फर्याबाग यास अटक केली आहे. रोहित पाटोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२१ रोजी एका तरुणीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. रोहित पाटोळे याचे व माझे एकमेकांवर प्रेम होते. दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहित याने त्याच्या मोबाईलमध्ये आमच्या दोघांचे खासगी फोटो काढलेले होते. त्यानंतर आरोपी रोहितने फिर्यादी तरुणीस लग्नाची मागणी घातली.त्यास या तरुणीने नकार दिला असता फिर्यादी तरुणी व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देवू लागला. तसेच फिर्यादी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक खाते तयार करून मोबाईलमध्ये काढलेले खासगी फोटो व व्हिडियो प्रसारित करू लागला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहित पाटोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Accused arrested for posting viral photos and videos