Home अहिल्यानगर रायगडाची राणी फेम कांताबाई सातारकर यांचे निधन

रायगडाची राणी फेम कांताबाई सातारकर यांचे निधन

Kantabai Satarkar passes away

Kantabai Satarkar passes away: विविध भूमिका निभाविणाऱ्या एक उत्तम अभिनेत्री, गायिका, व्यवस्थापक तमाशा क्षेत्रात स्वतःचे नावलौकिक निर्माण केलेल्या  कांताबाई सातारकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी संगमनेर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे.

ख्यातनाम तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे महाराष्ट्रात लोककला क्षेत्रात विलक्षण योगदान राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने २००५ साली तमाशा क्षेत्रातील योग्दनासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईचा सन्मान केला होता.

दिल्ली येथील झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता.

मराठी रंगभूमीवर एका स्त्रीने पुरुषाच्या विविध भूमिका केलेल्या त्या महिला कलावंत, पुरुष कलावंताना लाजवेल अशा भूमिका त्यानी केल्या होत्या. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका हुबेहुबे वठविल्या. त्यांचा संपूर्ण कलाक्षेत्रात नावलौकिक होते. त्यांनी नवव्या वर्षी साताऱ्यात नृत्याची सुरुवात केली होती.

कांताबाईचे संपूर्ण कुटुंब आजही तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. चिरंजीव रघुवीर खेडकर मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे.

Web Title: Kantabai Satarkar passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here