Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहिल्यानगर: तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahilyanagar Young Woman Suicide: २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.

Ahilyanagar Young Woman Suicide

अहिल्यानगर : नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी येथील दूधडेअरी चौक परिसरातील एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २) घडली. कावेरी दशरथ काळे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी परिसरातील दूध डेअरी चौक जवळील डोंगरे वस्ती येथे रविवारी (ता. २) दुपारी घडली. कावेरी दशरथ काळे (वय २०, रा. डोंगरे वस्ती, दूध डेअरी चौक, एमआयडीसी) असे या तरुणीचे नाव आहे.

नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी  आपला  अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज 

कावेरी काळे हिने घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच नातेवाईक गणेश चव्हाण यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खराडे यांनी दिलेल्या अहवालावरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Ahilyanagar Young Woman Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here