व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याच्या रागातून चक्क अॅडमीनची जीभच कापली
Pune Crime: पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार.
पुणे: व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी ग्रुप अॅडमिनला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रीती किरण हरपळे असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश किसन पोकळे, सुयोग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 28 डिसेंबर रोजी घडला होता. तक्रारदार दाम्पत्य आणि आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने ओम हाईट्स ऑपरेशन या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्यही होते. तक्रारदार महिलेचे पती या ग्रुपचे अॅडमिन होते. त्यांनी एका व्यक्तीला गृपमधून काढून टाकलं होतं. सोसायटीच्या व्हॉट्सअप गृपमधून काढून टाकल्याने त्या व्यक्तीचा राग अनावर झाला. मला व्हॉट्सअपच्या गृपमधून का काढलं? असं आरोपीने विचारलं होतं. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या पतीना भेटण्यासाठी बोलावून घेतलं आणि मारहाण केली. तक्रारदाराचा पती या व्यक्तीला भेटायला त्याच्या घरी गेली. ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असं त्यानं सांगितलं. त्यानंतर आरोपीने पाच जणांच्या साह्ययाने बेदम मारहाण केली. तोंडावर लाथाबुक्कीने मारहाण केली. यात त्याच्या दाताला आणि जीभेला मार लागला. यामध्ये त्याची जीभ कापली गेली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: admin cut his tongue out of anger at being removed from the WhatsApp group
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App