अहमदनगर: वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर उलटला, एक जण ठार
Ahmednagar News: वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर उलटून त्याखाली एक जण दबून ठार झाल्याची घटना.
श्रीरामपूर | Shrirampur: तालुक्यातील खैरी निमगांव येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर उलटून त्याखाली एक जण दबून ठार झाल्याची घटना आज गुरुवार (दि. 17) रोजी घडली.
शफीक अहमद पठाण उक्कलगांव असे वाळूच्या डंपरखाली दबून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोदावरी नदी पात्रातून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रॅक्टरद्वारे तसेच डंपरद्वारे वाळू उपसा केला जातो. या भागात वाळूचे अनेक पाँईट असुन काही दिवसांपुर्वी याच भागातील नायगाव डेपो शासनाने ताब्यात घेऊन वाळू धोरण राबवले होते.
या धोरणानुसार नागरिकांना स्वस्तात वाळू मिळाली नसल्याने या धोरणात शासन अपयशी ठरल्याने चोरट्या वाळूला मागणी दिसुन आली आहे. असे असतांना शासनाला हि चोरटी वाळू रोखता आली नाही. असाच वाळू उपसा करणारे विनाक्रमांकाचे डंपर गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नदीतून वाळू घेऊन येत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने खैरी निमगांव येथे उलटले. त्यात एकजण ठार झाला तर उर्वरीत तिन-चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना प्रत्यक्ष दर्शींच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आले आहे.
डंपरने हजारो ब्रास वाळू उपसा केला जातो. या वाळू उपसा करणार्या ट्रॅक्टर ट्रॉलीला तसेच डंपरला कुठल्याही प्रकारचा क्रमांक आढळून येत नाही. वाळू तस्करी करणार्या चालक व मालकाचे अधिकार्यांशी संगनमत असल्याने हा धंदा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Web Title: Accident Dumper transporting sand smuggled overturned, one killed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App