लाच स्वीकारल्याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघांवर एसीबीची कारवाई
Crime News: जनरल मुखत्यारपत्राची नोंदणी केलेली कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघांना ताब्यात.
मालेगाव : जनरल मुखत्यारपत्राची नोंदणी केलेली कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वरिष्ठ लिपिक सह दुय्यम निबंधक वर्ग २ ज्ञानेश्वर जिभाऊ खांडेकर (वय ३२) यांच्या सांगण्यावरून डाटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा सुरीतराम शेलार (वय ३६) यांना ५०० रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. यात एजंट दत्तू देवरे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ९) दुपारी ही कारवाई करण्यात आली. दस्तावेजाची मूळ कागदपत्रे संबंधित मूळ मालकास (तक्रारदारास) देण्यासाठी ज्ञानेश्वर खांडेकर यांनी ५०० रुपयांची लाच ऑपरेटर शेलार यांच्यामार्फत मागितली होती. ही लाच स्वीकारताना शेलार यांना पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी पंचासमक्ष मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्यासह पोलीस हवालदार सचिन गोसावी, गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाणके, परशुराम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: ACB action against three in the office of sub-registrar for accepting bribe
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App