Home क्राईम पिकांना पाणी द्यायला गेले, काही क्षणात होत्याचं नव्हतं; नियतीनं नवविवाहितेचं सौभाग्य हिरावलं

पिकांना पाणी द्यायला गेले, काही क्षणात होत्याचं नव्हतं; नियतीनं नवविवाहितेचं सौभाग्य हिरावलं

शेतात ऊसाला पाणी देत असताना २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.

A young farmer died due to a lightning Strike

पुणे: लोणी काळभोर परिसरात शेतात ऊसाला पाणी देत असताना २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दीपक काळभोर (वय २९ ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,  दीपक काळभोर हा लोणी काळभोर परिसरात राहणारा आहे. त्यांचे शेत तिथेच आहे. शेतामध्ये ऊस लावलेला असल्याने तो शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेला होता. शनिवारी सायंकाळच्या सुमारास लवसाचे वातावरण झाल्याने आकाशात विजा चमकत होत्या. मात्र, दीपक ऊसाला पाणी देत असताना अचानकपणे वीज त्याच्या अंगावर पडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ झाला मुलगा शेतातून घरी आला नाही म्हणून घरच्या लोकांनी शेतात जाऊन पाहणी केली. तर दीपक त्यांना जमिनीवर पडल्याचे आढळून आले. घरच्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

दिपकचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याचा संसार अजून फुलतच होता. अंगावरची हळद देखील अजून नीट निघालेली नव्हती. त्यातच अशी घटना घडल्याने त्याच्या पत्नीला धक्का बसला असून कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A young farmer died due to a lightning Strike

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here