Home क्राईम नाशिक हादरले! भरवस्तीत भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, परिसरात उडाली खळबळ

नाशिक हादरले! भरवस्तीत भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, परिसरात उडाली खळबळ

Nashik  Crime: भरवस्तीत भाजपच्या नेत्यावर गोळ्या झाडण्यात (Fired) आल्या. या गोळीबारामध्ये भाजप नेता गंभीर जखमी.

Shots were fired at BJP leader, there was excitement in the area

नाशिक: नाशिकमध्ये पुन्हा गँगवॉर झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी भरवस्तीत भाजपच्या नेत्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारामध्ये भाजप नेता गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. भरवस्तीत सकाळी सकाळी गोळीबार झाल्यामुळे नागरिकांची झोप उडाली

नाशिकच्या अंबड परिसरातील बाजीप्रभू चौकात रविवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली. भाजपचे माथाडी कामगार शहराध्यक्ष राकेश कोष्टी यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये राकेश कोष्टी गंभीर जखमी झाले आहेत.

गोळीबाराची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी आले आहेत. जखमी झालेल्या राकेश कोष्टी यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राकेश यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राकेश कोष्टी यांच्यावर गोळीबार झाल्याचे कळताच नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

राकेश कोष्टी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरुन पळ काढला. आरोपी रस्त्यावरील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरु आहे.

Web Title: Shots were fired at BJP leader, there was excitement in the area

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here