अचानक पाऊस आला, ती धावत-धावत वाळत घातलेले कपडे काढायला गेली, अन तिथेच घात झाला…
Sinnar News: वीज पडून (lightning strike) ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
नाशिकः सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वत्र थैमान घातले आहे. एकीकडे विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या वादळी वाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे आता मनुष्यहानी देखील होऊ लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात रामपूर पूतळेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वीज पडून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैशाली विजय कवडे असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी वैशाली कवडे पाऊस आल्याने घराच्या अंगणात लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
दरम्यान शेतकरी वर्ग व नागरिकांनी अवकाळी पाऊस सुरु होण्याआधी अथवा सुरु असताना सुरक्षित स्थळी थांबावे शेतीत जाण्याची घाई गडबड न करता काळजी घ्यावी.
Web Title: A 35-year-old woman died due to a lightning strike
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App