निळवंडेतून डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडले
Breaking News | Water Rotation: सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार.
राजूरः निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे.
रविवारी सकाळी भंडारदरा धरणातून वीजनिर्मिती केंद्रातून ८५० तर धरणाच्या मोरीतून ५०५ क्युसेक असा एकूण १ हजार ३५५ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू होता. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणी साठा ५ हजार ९२२ दलघफू होता.
निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून सकाळी अकरा वाजता विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी यात डाव्या कालव्यातून २५० तर उजव्या कालव्यातून २०० असे एकूण ४५० क्यूसेक पाणी कालव्यात सोडण्यात येत होते. आवर्तन सोडते वेळी निळवंडे धरणाचा पाणी साठा २ हजार ६७८ दलघफू होता.
निळवंडे व भंडारदरा धरणांच्या लाभक्षेत्रासाठी या पूर्वीच प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. रविवारी निळवंडे धरणातून वीजनिर्मितीसाठी ८०० क्युसेक तर विमोचकामधून ७०० असे एकूण १ हजार ५०० क्युसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. या बरोबरच निळवंडेच्या उच्चस्तरीय कालव्यातूनही विसर्ग सुरु आहे. यामुळे निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी नदी पात्र आणि कालवे मिळून १ हजार ९५१.५० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.
Breaking News: Summer circulation released from the left and right canals of Nilawande