संगमनेरात गजबजलेल्या परिसरात गळफास घेत तरूणाची आत्महत्या
Breaking News | Sangamner Suicide: जाणता राजा मैदानावरील एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
संगमनेर: शहरातील नेहमी गजबजलेला परिसर असलेल्या जाणता राजा मैदानावरील एका वडाच्या झाडाला गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सुनील बनसोडे असे या आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असल्याचे समजते. जाणता राजा मैदान परिसर नेहमीच गजबजलेला असतो. रात्री, पहाटे देखील नागरीकांची वर्दळ असते. आशा ठिकाणी वडाच्या झाडाला एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु त्याचे पाय जमिनीवर टेकलेले दिसत होते. तसेच झाडाची उंची देखील फारशी नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे की आणखी काही याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहे. याबाबत शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Web Title: young man committed suicide by hanging himself in a crowded area