Home संगमनेर संगमनेर: मालपाणी पॅलेस येथे उभारलेल्या सेटला आग

संगमनेर: मालपाणी पॅलेस येथे उभारलेल्या सेटला आग

Breaking News | Sangamner Fire: कार्यक्रमासाठी उभारलेल्या स्टेजला लागलेल्या भीषण आगीत पश्चिम बंगाल येथील २४ वर्षीय कामगार गंभीररीत्या भाजला.

Fire breaks out on set erected at Malpani Palace

संगमनेर : कार्यक्रमासाठी उभारलेल्या स्टेजला लागलेल्या भीषण आगीत पश्चिम बंगाल येथील २४ वर्षीय कामगार गंभीररीत्या भाजला. ही घटना बुधवारी (दि. १९) दुपारी चारच्या सुमारास तालुक्यातील कासारा दुमाला हद्दीत मालपाणी पॅलेस येथे घडली. तुषार दलाल असे जखमी कामगाराचे नाव आहे.

मालपाणी पॅलेस येथे कार्यक्रमासाठी भव्य असा सेट उभारण्याचे काम सुरू होते. यातील बरेचसे काम पूर्ण झाले असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास सेटला अचानक आग लागली. आग एवढी भयंकर होती की, सेटच्या मागील बाजूला लागूनच असलेल्या साधारण दहाहून अधिक मोठ्या झाडांपर्यंत ती पोहोचली. त्यात झाडांचेही मोठे नुकसान झाले.

पॅलेसच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर देखील आग पसरली होती. संगमनेर नगर परिषद, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. पाच-सहा फेऱ्या झाल्यानंतर आग आटोक्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक मनीष मालपाणी, संजय पेखळे, प्रशांत जुन्नरे, अमृत काजवे, राजेंद्र गुंजाळ, अमजद पठाण, सतीश बुरुंगुले, प्रवीण ताजणे हे घटनास्थळी पोहोचले. भाजलेल्या दलाल याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याच्यावर तेथे उपचार करून पुढील उपचारांसाठी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Fire breaks out on set erected at Malpani Palace

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here