Home अमरावती महाराष्ट्र हादरला! मठात तरुणीवर वारंवार बलात्कार; 8 महिन्यांची गर्भवती असताना…

महाराष्ट्र हादरला! मठात तरुणीवर वारंवार बलात्कार; 8 महिन्यांची गर्भवती असताना…

Breaking News | Amaravati Crime: अमरावतीच्या एका मठात अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले.

Young girl repeatedly raped in monastery At 8 months pregnant

अमरावती: अमरावतीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या एका मठात अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच संताप व्यक्त केला जात असून तिघांना या प्रकरणी अटक केली आहे.  शिरखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्रमुनी तळेगवावकर, बाळासाहेब देसाई व पीडित मुलीची मावशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,  या पाशवी कृत्यात पीडित मुलीच्या मावशीचाही सहभाग होता. मावशीनेच मुलीला नराधमांच्या ताब्यात दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरखेड ठाण्याच्या हद्दीत एका गावात सुरेंद्रमुनी तळेगावकर यांचा मठ आहे. तिथेच पीडित मुलगी त्याच मठात राहत होती.

2 एप्रिल 2024 रोजी पीडित मुलगी ही मावशी व मठातील इतर मुली, महिलांसोबत झोपली होती. रात्री 12 वाजताच्या सुमारास मावशीने तिला झोपेतून उठवले. मावशी मुलीला बाबांच्या मठात घेऊन गेली. तेव्हा तिथे आधीच आलेल्या सुरेंद्र तळेगावकर याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने विरोध केल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. तसंच, जीवे मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या पीडित मुलीने मावशीला सगळी आपबीती सांगितली. मात्र मावशीने तिला कोणालाही काहीही सांगू नको, असे बजावले. तेव्हापासून पीडित मुलीला मठाच्या बाहेर जाण्यास रोखले. आरोपीने पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार केला. यात तिची मावशीदेखील सामील होती. इतकंच नव्हे तर अन्य एका व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केले.

सततच्या होणाऱ्या अत्याचारानंतर पीडित मुलीला गर्भधारणा झाली. त्यामुळं तिने याबाबत मावशीला सांगितले. यावर मावशी तिला रुग्णालयात घेऊन गेली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना माहिती मिळताच तिघांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे. या दोन्ही नराधमांनी बळजबरीने अत्याचार केल्याचे पिडीतेने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान पिडीता आठ महिन्याची गर्भधारणा झाली आहे. याबाबत  तपास सध्या शिरखेड पोलीस करत आहे.

Web Title: Young girl repeatedly raped in monastery At 8 months pregnant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here