पत्नीच्या चारित्र्यांवर संशय, हत्या अन नंतर अपघाताचा बनाव मात्र……
Breaking News | Nagpur Crime: पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेत तिची हत्या करण्यात आल्याची दुदैवी घटना घडली आहे. या हत्येनंतर पतीने अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न.
नागपूर: जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेत तिची हत्या करण्यात आल्याची दुदैवी घटना घडली आहे. या हत्येनंतर पतीने अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बनाव फार काळ टीकू शकला नाही आणि नवऱ्याच पितळं उघडं पडलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तुळजाई नगरमध्ये हे दाम्पत्य राहत होतं. या घटनेत मृत महिलेच नाव राखी पाटील असे होते. खरं तर या घटनेत मृत राखी पाटी ही दीड महिन्यापूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच ती घरात परतली होती. या प्रकारामुळे पती सुरजने पत्नी राखीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. तसेच घटनेच्या दिवशी सुरजने राखीला फोनवर कोणाशी तरी बोलतानाही रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे रागाच्या भरात सुरजने राखीची हत्या केली होती.
त्यानंतर बायकोची हत्येची घटना लपवण्यासाठी सूरजने हत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार सूरजने या हत्येला अपघाताचे स्वरूप देत रुग्णालयात नेले होते. तेथे त्याने बायको छतावरून पडल्याची माहिती डॉक्टरांना दिली होती. त्यानंतर या घटनेवर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी हत्येचा तपास सूरू केला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर घरभर रक्त पसरलेले दिसले होते. त्यामुळे पहिला संशय पतीवरच बळावला आणि त्यांनी पतीची चौकशी करायला सुरुवात केली होती. मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने रुग्णालयातून पळ काढला होता.मात्र नंतर सापळा रचून पतीला पोलिसांनी अटक केली होती.यावेळी केलेल्या चौकशीत सुरज पाटीलने हत्येची कबूली दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Doubts on wife’s character, murder and then fake accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News