Home महाराष्ट्र धक्कादायक! महाविद्यालयीन युवतीवर कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार

धक्कादायक! महाविद्यालयीन युवतीवर कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार

Breaking News | Sangli Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीवर सांगली-मिरजेतील कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस.

College girl sexually assaulted in cafe

सांगली : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महाविद्यालयीन अल्पवयीन युवतीवर सांगली-मिरजेतील कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित अरिहंत संजय छंचुरे (वय 19, रा. बजरंगनगर, कुपवाड) याला अटक केली असून त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

.सांगली-मिरजेतील कॅफे पुन्हा वादात सांगली-मिरजेतील अनेक कॅफे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या कॅफेमध्ये अश्लील चाळे केले जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. काही युवतींवर बलात्काराच्या घटनाही घडल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित युवती अल्पवयीन असून एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित अरिहंत याने ओळख वाढवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पीडितेला एका कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याने तिचे फोटोही काढले. नंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 20 नोव्हेंबर 2023 पासून सांगली आणि मिरजेतील कॅफेमध्ये तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. 16 ऑक्टोबर रोजी संशयित अरिहंत याने पीडितेचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले.

Web Title: College girl sexually assaulted in cafe

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here