Home क्राईम चारित्र्याच्या संशयावरून पतीनं भिंतीवर डोकं आपटून पत्नीला केलं ठार

चारित्र्याच्या संशयावरून पतीनं भिंतीवर डोकं आपटून पत्नीला केलं ठार

Crime News: चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीने लाथाबुक्क्याने मारहाण करून पत्नीचा खून (Murder) केल्याची घटना.

husband Murder his wife by hitting her head on the wall due to suspicion of her character

सातारा | म्हसवड : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीने लाथाबुक्क्याने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना म्हसवड पोलिस ठाण्यानजीकच्या क्रांती सूर्यनगर कॉलनीत घडली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. म्हसवड क्रांती सूर्यनगर) असे संशियीत आरोपीचे नाव आहे.

दीपाली धोंडिराम पुकळे (वय ३२) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. शनिवारी (ता. चार) संध्याकाळी नऊ ते रविवारी (ता. पाच) दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली

याबाबत अधिक माहिती अशी की,  धोंडिराम नाना पुकळे याने दारूच्या नशेत चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी दीपालीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व भिंतीवर व व्यायाम करायच्या डंबेलवर आपटून गंभीर जखमी करून ठार मारले.

फरशीवर व भिंतीवर पडलेले रक्त मुलगा निखिल व आयुष यांच्याकडून साफ करून घेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मयत दीपालीचे वडील आबा कोडलकर यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी संशयित धोंडिराम याला त्वरित अटक केली. घटनास्थळी दहिवडी येथील पोलिस उपअधीक्षक अश्‍विनी शेंडगे यांनी भेट दिली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

Web Title: husband Murder his wife by hitting her head on the wall due to suspicion of her character

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here