संगमनेरमध्ये विखेंचा प्लॅन फसला, भोपळाही फोडता आला नाही, सगळ्यांचं डिपॉझिट जप्त
Sangamner Bajar Samiti Election Result: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागा जिंकून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध.
संगमनेर: संगमनेरच्या राजकारणात सातत्याने हस्तक्षेप करून तेथे आपली सत्ता मिळविण्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सतत प्रयत्न सुरू आहे. मात्र बाजार समिती निवडणुकीत त्यांचा प्लान पूर्णपणे फसला आहे. प्रचारासाठी स्वत: फिरले. मात्र, यावेळी त्यांना यश आले नाही. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागा जिंकून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. थोरातांचे सर्व उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले तर विखे यांच्या अधिपत्याखालील भाजप प्रणित मंडळाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सभापती शंकरराव हनुमंता खेमनर, कान्हेरे सुरेश रामचंद्र, खताळ सतीश विश्वनाथ, गायकवाड गीताराम दशरथ, गोपाळे मनीष सूर्यभान, पानसरे कैलास बाळासाहेब, सातपुते विजय विठ्ठल, हे निवडून आले आहे. तर महिला राखीव मतदार संघातून सौ. वरपे दिपाली भाऊसाहेब व सौ साकोरे रुक्मिणी शिवाजी या विजयी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातून -ताजने सुधाकर पुंजाजी तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून-घुगे अनिल शिवाजी हे विजयी झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून भंडारी मनसुख शंकर व शेख निसार गुलाब हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघातून- वाघ अरुण तुळशीराम, शरमाळे सखाहारी बबन, खरात संजय दादा, कडलग निलेश बबन हे विजयी झाले आहेत. दुसरीकडे मैत्रीपूर्ण लढत झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघातून करपे सचिन बाळकृष्ण हे विजयी झाले आहेत.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी व शेतकऱ्यांसाठी सुख सुविधा देणारी अद्ययावत बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीवर काँग्रेसचे नेते थोरात यांचे एक हाती यांची वर्चस्व राहिले आहे. गेली अनेक वर्षे या बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या. मात्र यावर्षी विरोधकांमुळे निवडणूक घेण्याची वेळ आली. तरीही यातून थोरात यांचेच वर्चस्व सिद्ध झाले. विरोधकांना भोपळाही फोडता आला नाही.
राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना हरवून अपक्ष उमेदवार सचिन कर्पे विजयी ठरले आहेत. त्यांनी १४७ पैकी ९० मते घेतली. त्यांनी हमाल मापाडी संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजय मिळवल्यानंतर सचिन कर्पे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देत भाजपला धक्का दिला.
Web Title: Sangamner Bajar Samiti Election Result
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App