अहमदनगर: हायस्कूलमध्ये महिलेचा विनयभंग
Ahmednagar Woman Molested: एका शिक्षिकाने महिलेला मारहाण करीत शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना.
अहमदनगर: हायस्कूलमधील शिक्षकाने कामगार महिलेला शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील एका हायस्कूलमध्ये घडली. पीडित कामगार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद जफर हसनमिया (रा. झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी लोक आले होते. फिर्यादी त्यांना हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही कुठे बसवायचे ते दाखवित होत्या. तेवढ्यात तेथे शिक्षक सय्यद जफर हसनमिया आला.
त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. उजवा हात धरून मारहाण केली व जोरात खाली ढकलून दिले. फिर्यादी उठून उभ्या राहिल्यानंतर सय्यद जफर हसनमिया याने फिर्यादीच्या खांद्यावर हात ठेऊन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून सय्यद जफर हसनमिया याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Ahmednagar Woman Molested in School
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App