बँक मॅनेजर महिला कर्मचाऱ्याकडे करीत होता शरीरसुखाची मागणी अन मग
Ahmednagar Crime: बँक मॅनेजर महिला कर्मचाऱ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत देत होता त्रास महिलेने तक्रार केली दाखल.
अहमदनगर: बँक मॅनेजरने बँकेतीलच एका महिला कर्मचार्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना उपनगरातील एका बँकेच्या शाखेत घडली. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बँक मॅनेजरविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. संदीप श्रीमल भळगट (रा. तारकपूर बस स्थानकाजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या बँक मॅनेजरचे नाव आहे.
मे, 2022 मध्ये फिर्यादी या बँक कामासाठी मॅनेजर भळगट सोबत त्यांच्या दुचाकीवरून विनायकनगर येथे गेल्या होत्या. काम झाल्यानंतर ते दोघे बालिकाश्रम रोडने येत असताना फिर्यादी दुचाकी चालवित होत्या व भळगट हा पाठीमागे बसला होता. त्यावेळी भळगटने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याच्या या कृत्यामुळे फिर्यादी त्याच्यावर रागावल्या व त्याला सोडून निघून गेल्या होत्या.
दरम्यान भळगट हा फिर्यादीला वारंवार टेक्स मॅसेज, व्हॉट्सअप मेसेज करून तसेच बॅकेच्या कॅबीनमध्ये बोलवून वारंवार शारिरीक सुखाची मागणी करत मानसिक त्रास देत होता. यासंदर्भात त्यांनी बँकेच्या सर्कल हेड ऑफिसकडे तक्रार केली होती. त्यांनी या तक्राराची दखल न घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
Web Title: bank manager was asking the female employee for sexual Relation Demand