अकोले: विहिरीत बुडणाऱ्या महिलेचे तरुणाने वाचविले प्राण
भंडारदरा: अकोले तालुक्यातील बारी गावाजवळील जहागीरदारवाडी येथील दोन तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून विहिरीत बुडणाऱ्या महिलेला वाचविले असल्याची घटना नुकतीच घडली. या तरुणावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अकोले तालुक्यातील जहागीरदारवाडी येथील नीता काळू खाडे हि २५ वर्षीय महिला पाणी आणण्यासाठी गावाबाहेर असलेल्या विहिरीवर गेली होती. या महिलेव्यातीरेक्त इतर महिलांचीही विहिरीवर तुडुंब गर्दी होती. पाणी शेंदत असताना अचानक तोल जाऊन हि महिला विहिरीत पडली. त्याचवेळी या महिलेसोबत अनिल खाडे व भास्कर खाडे हे तरुणही विहिरीवर पाणी नेण्यासाठी आले होते. विहिरीत कोणीतरी पडल्याचे समजताच त्यांनी आहे त्या स्थितीत विहिरीत उडी घेतली. त्यांनी नीताला तत्काळ विहिरीतून बाहेर काढले. तिच्यावर जागेवरच प्राथमिक उपचार करीत तिचे प्राण वाचविले. या दोन तरुणानी धाडस दाखवून महिलेचे प्राण वाचविल्यामुळे या तरुणांचे भंडारदरा परिसरातून अभिनंदन होत आहे.
Website Title: Akole survived the youth of a well drowned woman