संगमनेर: पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेस लुटले
Sangamner Theft | संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा परीसरात पोलिस असल्याची बतावणी करत वृद्ध महीलेस लुटल्याची घटना सोमवार दिनांक ४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताराबाई किंसन पांडे या आंबीखालसा येथे राहत आहेत व आठवडे बाजारात त्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. सोमवारी दुपारी त्या आंबीखालसा फाट्यावरील भारद्वाज मोटर्स जवळून पायी चालल्या होत्या. त्याच वेळी दोघे जण दुचाकीवर येऊन म्हणाले की आजी आम्ही पोलिस आहोत. सध्या चोरांचा जास्त सुळसुळाट झाला आहे. तुम्ही तुमच्या गळ्यातील दागीने काढून द्या मी पुडीत बांधून देतो. असे म्हणल्यावर ताराबाई पाँडे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवते दागीने काढून त्यांच्याकडे दिले. तर त्या महाठगांनी वाळू भरलेली पुडी त्या वृद्ध महीलेस दिली व तेथून ते चालते झाले. ही महीला आंबीखालसा येथे आल्यावर इतरे महीलांना सांगू लागली की दागीने वापरू नको चोरांची भिंती वाढली आहे. मला आत्ताच पोलिसांनी सांगितले व पुडीत दागने घेऊन जाण्यास सांगितले आहे. त्यावेळी ती पुडी उचकून पाहीली असता त्यात वाळू भरलेली दिसली. हे पाहून या वृद्ध महीलेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर वृद्ध महिलेने एकच टोहो फोडला.
दरम्यान् घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लांघे, संतोष फड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण विचारपूस केली. व घटनास्थळी जात पाहणी केली.
Web Title: Pretending to be a policeman, the woman was theft