संगमनेरात पत्रकार भवनासाठी १० लाख रुपयांचा निधी जाहीर- आ. खताळ
Sangamner News: पत्रकारदिनी आ अमोल खताळ यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान.
संगमनेर : सर्व पत्रकारांनी एकत्रित येत एक समिती गठीत करावी. आणि तुम्ही आणि आपण सर्वजण या पत्रकार भवनासाठी शहरात कुठे शासकीय जागा उपलब्ध आहे. याचा शोध घेऊ माझ्या पहिल्याच आमदारनिधी मधून पत्रकार भावनासाठी दहा लाख रुपयांचा निधी जाहीर करत असल्याची घोषणा आ अमोल खताळ यांनी पत्रकार दिनी केली.
पत्रकार दिनानिमित्त आमदार अमोल खताळ यांच्या वतीने पत्रकार सन्मान व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यास पीठावरती व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ मदने,मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्याम तिवारी, जेष्ठ पत्रकार राजा वराट, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, मंगेश सालपे आदी उपस्थित होते.
आ खताळ म्हणाले की संगमनेरच्या पत्रकारांनी या पूर्वीही विकासाला नेहमी साथ दिलेली आहे. सत्ता नसतानाही सर्व पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमा तून विरोधकांना जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.त्यामुळेच संगमनेर विधानसभा मतदार संघात खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले आहे हे कुणीही नाकारुन चालणार नाही.पत्रकारांनी आपल्याला येथून मागे ही चांगली साथ दिली आहे. अन येथून पुढेही चांगली साथ द्यावी असेआवाहन करून ते म्हणाले की ज्यांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्यासाठी आणि ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी ही आपण काम करणार आहे. तसेच शासकीय कार्यालया मध्ये शहरी व ग्रामीण भागातील नागरिक गेल्यानंतर त्यांना कशी वागणूक मिळते यावर सुद्धा आपले बारीक लक्ष राहणार आहे. कोणाचेही काम आडणार नाही. अशा स्पष्ट सूचना सर्वच शासकीय कार्या लयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण सूचना दिले असल्याचे आ अमोल खताळ यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोरक्ष नेहे यांनी केले स्वागत रोहन वैद्य यांनी केले तर आभार भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शशांक नामन यांनी मानले .यावेळी संगमनेर शहर व तालुक्या तील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावरती काही जणांकडून व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्याचीही चौकशी सुरु असून या प्रकरणी दोषी असलेल्यांना कदापि सोडणार नाही असे ही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी ठणकावून सांगितले
संगमनेर शहरात झालेली अनाधिकृत अतिक्रमणे यामुळे शहरात अशांतपणा व विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. त्या मुळे अतिक्रमण हटवल्याशिवाय शहरा तील रस्ते मोकळे होणार नाही.ज्यांचे अतिक्रमण आहे त्या सर्वांना प्रशासनाच्या वतीने नोटिसा पाठविण्यात आल्या असून पुढील आठवड्यामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच धूळखात पडलेली सिंग्रल व्यवस्थाही कार्यान्वित करणार असल्याचे आ खताळ यांनी सांगितले
ज्या भारतीय जनता पार्टी आणि महा युतीच्य जोरावर तुम्ही नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार झाले आहे. तुम्ही तुमच्या मामाचे झाले नाही तर तुम्ही भाज पाचे कसे होणार. पदवीधर मतदार संघा मध्ये नाशिक अहिल्यानगर, जळगाव,धुळे नंदुरबार हे जिल्हे येत आहे. तेथील अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. परंतु तुम्ही संगमनेरच्या गल्लीबोळातील प्रश्न शासन दरबारी मांडत आहे ज्या २ लाख ८८ हजार मतदारांनी मला निवडून दिले आहे.त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहे.तुमची काही गरज नाही अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी आ सत्यजित तांबे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.
Web Title: 10 lakh rupees fund announced for Patrakar Bhawan in Sangamaner Amol Khatal
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News