Accident: नगर पुणे महामार्गावर कारला अपघात, बाप लेकाचा मृत्यू
Ahmednagar | अहमदनगर: नगर पुणे महामार्गावर कामरगाव शहरात असलेल्या हॉटेल ग्रीन पार्क परिसरात एका अज्ञात वाहनाने अल्टो कारला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या भीषण अपघातात बाप लेक जागीच ठार झाले आहेत.
या अपघातात बाजीराव मिसकर आणि ओम मिसकर या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील जळगावचे रहिवासी आहेत.
आज सकाळी साडे सहाच्या सुमारास अल्टो कारला (15 बी एन 72 96) अहमदनगर पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अपघात एवढा भीषण होता की अल्टो कारचा चक्काचूर झाला आहे.
Web Title: Two Death in car accident on Nagar Pune highway