Home महाराष्ट्र Women’s Day Special: मुंबई महिला पोलिसांना महिला दिनानिमित्त मोठी भेट  

Women’s Day Special: मुंबई महिला पोलिसांना महिला दिनानिमित्त मोठी भेट  

gift to Mumbai Women Police on the occasion of Women's Day

मुंबई: आज जागतिक महिला दिन (Women’s Day Special) या दिनानिमित्ताने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस दलामधील महिला कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. आजपासून मुंबई पोलीस दलामधील महिलांना आठ तासांची ड्युटी असणार आहे.

घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल राखता यावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला दिनापासून पुढील आदेशापर्यंत महानगरात हे निर्देश लागू असणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

पोलीस आयुक्तांच्या दिलेल्या आदेशानुसार, महिला कर्मचार्‍यांसाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय त्यांना सकाळी ८ ते ३, दुपारी ३ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशा ३ शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे.

दुसरा पर्याय  सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा शिफ्टच्या वेळा असणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने यावेळी सांगितले आहे.

Web Title: gift to Mumbai Women Police on the occasion of Women’s Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here