Home अहमदनगर ती गेली ते परत आलीच नाही,  तरुणी बेपत्ता

ती गेली ते परत आलीच नाही,  तरुणी बेपत्ता

Ahmednagar young woman disappeared

राहता | Ahmednagar: किराणा दुकानात जाते असे सांगून घरातून बाहेर गेलेली एक 20 वर्षीय तरुणी राहात्यातून झाल्याची घटना समोर आली आहे. धनश्री राजेंद्र विसपुते (वय 20) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे.

धनश्रीचे वडील राजेंद्र पंढरीनाथ विसपुते यांनी राहाता पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती  दिली आहे. राहाता पोलिसांनी 45/2021 प्रमाणे बेपत्ता म्हणून नोंद केली आहे. यातील बेपत्ता मुलगी धनश्री ही काल 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून समोर असलेल्या एका किराणा दुकानात किराणा सामान आणण्यासाठी जाते, असे सांगून गेली. ती परत आली नाही. तिला सगळीकडे शोधले असता ती कोठेही मिळून आली नाही.  अशी खबर पोलिसात तिच्या वडिलांनी दिली.

तरुणीचे वर्णन:

रंग गोरा, उंची 5 फुट, शरिरबांधा सडपातळ, नाक सरळ, लांब केस, अंगात पिवळसर पंजाबी ड्रेस, पायात काळ्या रंगाचे सँडल या वर्णनाची तरुणी आढळल्यास राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रकरणी अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे हे करत आहेत.

Web Title: Ahmednagar young woman disappeared

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here