छिंदम बंधूंना अटक, या गुन्ह्यात पोलिसांची कारवाई
अहमदनगर | Ahmednagar News Today: माजी महापौर श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम या दोघा बंधूना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीगेट येथील ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.
भगिरथ भानुदास बोडखे यांच्या फिर्यादीवरुन छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर 30 ते 40 जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. छिंदम बंधूंसह चार जणांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. सदर अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर न्या. सुरेंद्र पी. तावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने फेटाळल्यानंतर बुधवारी सकाळी श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांना अटक करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar News Today Chhindam brothers arrested