Home अकोले भंडारदरा व निळवंडे धरण भरले इतके टक्के

भंडारदरा व निळवंडे धरण भरले इतके टक्के

percentage of Bhandardara dam filled up

भंडारदरा | Bhandardara Dam:  तीन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले असुन भंडारदरा धरणामध्ये  पाण्याची आवक सरु झाल्याने  भंडारदरा धरणाला आता भरण्याचे वेध लागले आहेत . गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा  ९७५७ दलघफटावर पोहचला आहे .

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सलग तीन आठवडे पावसाने विश्रांती घेतली होती. पंरतु बुधवारी संध्याकाळी सहा वाजेनंतर भंडारदरा व भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरु झाला असुन गुरुवारीही पावसाची सततधार टिकुन आहे .त्यामुळे परीसरातील ओढ्या नाल्यासह धबधबेही उंचावरुन कोसळु लागले असुन भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ सुरुच आहे . दरवर्षी भंडारदरा धरण १५ ऑगस्ट पुर्विच भरण्याची पंरपंरा यावर्षी मात्र खंडीत झाली असुन भंडारदरा धरण कधी भरते याकडे संपुर्ण उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते .आता भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरु झाल्याने भंडारदरा धरणाला भरण्याचे वेध लागले आहे .गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा  ९७५७ दलघफुट झाला असुन भंडारदरा धरण  ८८.३७ टक्के भरले आहे. निळवंडे धरण ७८.२५ टक्के भरले आहे. तर शनिवारी सकाळी ६ वाजता भंडारदरा ९०९३.५१  टक्के आणि निळवंडे ८०.७० टक्के, आढळा ५४.६२ भरले आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाअभावी भातशेती धोक्यात आली होती . पंरतु परत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने पुनरागन केल्याने या भातपिकांना जिवदान मिळणार आहे . तर पावसामुळे रिंगरोडवरील निसर्ग सौंदर्यही बहरले असुन धबधबेही वाहते झाले असुन सलग तीन सुट्टया आल्याने भंडारद-याला पर्यटकांच्या गर्दीचा महापुर दिसण्याचा संभव आहे .

गत चौविस तासात भंडारदरा येथे ३० मी मी पावसाची नोंद झाली असुन पावसाचे माहेरघर समजल्या जाणा-या घाटघरला ३४ मी मी पाऊस पडला आहे .तर पांजरे येथे ५४ मी मी तर वाकी येथे २० मी मी पावसाची नोंद झाली .भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सर्वात जास्त पावसाची नोंद रतनवाडी येथे झाली असुन तेथे ६४ मी मी पाऊस पडला . तर गत बारा तासात भंडा’दरा येथे ११ मी मी पावसाची नोंद झाली आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरातही पाऊस कोसळत असुन कॄष्णावंती नदी वाहती झाल्याने वाकी लघु बंधा-यावरुन ५५६ क्युसेक्सने वाहत असुन निळवंडे धरणातही आवक सुरु आहे. 

Web Title: percentage of Bhandardara dam filled up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here