पहिली पत्नी असताना आणखी दोन लग्न करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
राहुरी | crime News: पहिली पत्नी असताना आणखी दोन लग्न करणाऱ्या तसेच घरबांधणी व गायी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपयांची मागणी करत छळ करणाऱ्या पतीवर राहुरी (Rahuri)पोलीस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविता विजय नागरे रा. निंभेरे या विवाहितेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, ऑगस्ट २०१३ मध्ये विजय नागरेशी विवाह झाला होता. लग्नानंतर अडीच वर्ष संसार सुरु होता.मात्र २०१५ नंतर सासरच्या लोकांकडून दुधाचा व्यवसाय करण्यासाठी गायी घ्यायच्या असल्याने माहेरून दोन लाख रुपये आणावेत ही मागणी सुरु झाली. ही मागणी पूर्ण केल्याने पुन्हा मोटार कार घेण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र या पैशाची पूर्तता न झाल्याने सासरच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छळ करून घरातून हाकलून देण्यात आले.
यादरम्यान नवरा विजय नागरे याने आणखी दोन लग्न करून आपली फसवणूक केल्याचे सविता नागरे या विवाहितेने फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरून विजय नागरे सह सासरच्या इतर पाच लोकांवर विवाहितेचा छळ व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime news ahmednagar two more married husbands while first wife