Home अहमदनगर घरातून उचलून नेत केलेल्या मारहाणीतील व्यक्तीचा मृत्यू

घरातून उचलून नेत केलेल्या मारहाणीतील व्यक्तीचा मृत्यू

Ahmednagar News Death of a person who was picked up from the house

अहमदनगर | Ahmednagar News: नगर शहरातील रामवाडी येथे बुधवारी सकाळी झालेल्या मारहाणीत रामवाडी येथे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कचरू दत्तू कांबळे वय ४५ रा. रामवाडी नगर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

कांबळे यांस सोमवारी दोघा जणांनी घरातून उचलून नेले. कांबळे यांना त्यांनी बेदम मारहाण करीत पुन्हा घरी आणून सोडले. त्यांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे कांबळे यांना जबर मार लागल्याने व वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मयताचे नातेवाईक यांनी बुधवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात जात आरोपींना अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी सदर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. तोफखाना पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Web Title: Ahmednagar News Death of a person who was picked up from the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here