Home अहिल्यानगर कोरोना नियम धुडकावून आरोग्य अधिकाऱ्याची कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी, नोटीसा बजाविल्या  

कोरोना नियम धुडकावून आरोग्य अधिकाऱ्याची कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी, नोटीसा बजाविल्या  

Birthday party at the health officer's Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी करोनाचे संपूर्ण नियम पायदळी तुडवत कार्यालयातच वाढदिवसाची पार्टी केली. सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर फिरू देणाऱ्या आयुक्तांनी पार्टीला परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्टीचे व्हिडियो सोशियल मेडीयावर व्हायरल झाले होते.

त्यामुळे महानगरपालिका आयुक्त यांनी शनिवारी कारवाईची नोटीस बजावली आहे. डॉक्टर बोरगे यांनी २७ मे रोजी कार्यालयात कर्मचारी यांच्यासमवेत मास्क न वापरता, गर्दी जमवून, सामाजिक अंतर न पाळता वाढदिवस साजरा गाणे गात असल्याची वार्ता व्हायरल झाली. त्यामुळे डॉ. बोरगे यांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून आल्याने शासनाचे नियम उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे असे नोटीसमध्ये म्हंटले आहे. तसेच या पार्टीत सहभागी होणारे सहा कर्मचारी यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. या पार्टीतील महिला कर्मचाऱ्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.  

Web Title: Birthday party at the health officer’s Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here